हरिबाबा मंदिरात श्रावण मासानिमित्त महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

श्रावण मासानिमित्त फलटणच्या श्री सद्गुरू हरिबाबा मंदिरात १३ ऑगस्टपासून महिनाभर ज्ञानेश्वरी पारायण व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ११ ऑगस्ट : श्रावण मासानिमित्त येथील श्री सद्गुरू हरिबाबा समाधी मंदिरात गुरुवार, १३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण महिनाभर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनंदिन कार्यक्रमांची रूपरेषा

या महिनाभर चालणाऱ्या उपक्रमात दररोज सकाळी ७ ते ८ या वेळेत हरिपाठ आणि ८ ते ९ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. तसेच दुपारी ३ ते ५ या वेळेत महिलांसाठी विशेष भजन सेवा, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन आणि रात्री ७ ते ८.३० या वेळेत भजन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.

भाविकांना सहभागाचे आवाहन

सद्गुरू हरिबाबा महाराज सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पारायणासाठी आवश्यक असणारे श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ मंदिर कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरी सर्व भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!