

स्थैर्य, हणमंतवाडी, दि. ५ जून : हणमंतवाडी (ता. फलटण) गावचे माजी लोकनियुक्त सरपंच विक्रमसिंह जाधव यांचे वडील बाळासाहेब हरिभाऊ जाधव (भाऊ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज शुक्रवार, दिनांक ५ जून रोजी दुपारी २.०० वाजता हणमंतवाडी (जाधवमळा) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे हणमंतवाडी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.