सोनगाव येथे गादीवाफ्याचे कृषीकन्यांकडून शेतकर्‍यांना मार्गदर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ११ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील सोनगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय, फलटणच्या आठव्या सत्रातील विद्यार्थिनींनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत गादी वाफा याबद्दल माहिती शेतकर्‍यांना दिली. यावेळी गादी वाफ्याचा वापर व त्याचे फायदे याबद्दल त्यांना सांगण्यात आले.

कृषी महाविद्यालयाचे प्राचर्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिशा पंडीत व प्रा. संजय अडत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या हर्षल भालघरे, प्रीतल भोसले, प्रेरणा खोपडे, वैष्णवी पिसाळ, भाग्यश्री राऊत, नेहा साळुंखे, नंदिनी शिंदे या कृषिकन्यांनी हा कार्यक्रम पार पाडला.


Back to top button
Don`t copy text!