राजाळे येथील श्री जानाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये निर्भया पथकामार्फत मार्गदर्शन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २३ जुलै २०२३ | फलटण |
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे श्री जानाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज राजाळे येथे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांचेमार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस व पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल वैभवी भोसले, राणी कुदळे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय भिसे यांनी विद्यालयामध्ये इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना निर्भया पथकामार्फत मार्गदर्शन केले.

यावेळी वैभवी भोसले मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुलींनी पुस्तकांवर प्रेम करावे, असा संदेश त्यांनी दिला. उपस्थित सर्व निर्भया पथकातील अधिकार्‍यांचे स्वागत गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन विद्यालयाचे प्राचार्य श्री. नेरकर सर यांनी केले.

याप्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निंबाळकर सर यांनी केले. प्राचार्य श्री. नेरकर सर यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. सुरवसे मॅडम यांनी आभार मानले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!