📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.०२ एप्रिल २०२२ । सातारा । महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातारा येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात होणार आहे. या क्रीडा संकुलाला भेट देवून स्पर्धेच्या तयारीची पहाणी सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी प्रेक्षक गॅलरी, माती व मॅटवरील कुस्ती आखाड्यांची पहाणी केली तसेच तेथे येणाऱ्या नागरिकांसाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधांची तसेच खेळाडूंच्या निवास व्यवस्था, नाष्टा, जेवणाच्या व्यवस्थेबाबत इतर सोयी-सुविधांचीही यावेळी माहिती घेतली.
