
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. 05 ऑक्टोबर 2021 । फलटण । राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमांना फलटण एस. टी. आगारात प्रभारी आगार व्यवस्थापक रोहीत नाईक यांचे हस्ते पुष्पहार घालुन जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मध्यवर्ती कार्यालयाच्या सुचने नुसार महात्मा गांधी जयंती निमीत्त फलटण आगारात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
यावेळी स्थानक प्रमुख राजेंद्र वाडेकर, वाहतुक निरीक्षक दत्ताञय महानवर, स.कार्यशाळा अधिक्षक गायकवाड, स.वाहतुक निरीक्षक धिरज अहिवळे, वरिष्ठ लिपीक लहु चोरमले, पंकज वाघमारे, धिरज खुळपे उपस्थीत होते.
