वावरहिरे, ता.माण येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना सरपंच चंद्रकांत वाघ. समवेत ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ.
स्थैर्य, दहिवडी दि.७: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वावरहिरे (ता.माण) ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. सरपंच चंद्रकांत दादासो वाघ यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मल्हारी जाधव, शामराव राऊत, दिपक भोसले, पद्माकर भोसले, तुळशीराम यादव, रोहन भोसले, दत्तात्रय भोसले, अभिमन्यु सावंत तसेच वावरहिरे ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी व भिमज्योत मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.