फलटण येथे भारतीय जनता पार्टीच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


 

  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

स्थैर्य, फलटण दि.७ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलटण येथे भारतीय जनता पार्टीच्यावतीने अभिवादन करण्यात आले. 

यावेळी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी भाजप सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण नगरपरिषदेचे गटनेते नगरसेवक अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, भाजप शहर अध्यक्ष अमोल सस्ते, भाजप युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक डॉ.प्रविण आगवणे, भाजप ओबीसी शहर अध्यक्ष राजाभाऊ शिंदे, तानाजी करळे, संजय गायकवाड, अजित गायकवाड, नितिन वाघ, निलेश चिंचकर उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!