एलसीबीकडून मोबाईल चोरीचा छडाअल्पवयीन युवकाकडून 30 हजारांचे स्मार्टफोन हस्तगत


 

स्थैर्य, सातारा,६: स्थानिक गुन्हे शाखेने बाँबे रेस्टॉरंट चौकात मोबाईल चोरणार्‍या सराईत चोरट्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून सॅमसंग, ओपो, रेडमी असे 30 हजारांचे फोन पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

याबाबत माहिती अशी, दि 6 रोजी मोबाईल चोरीतील विधीसंघर्ष बालक बॉम्बेरेस्टॉरंट चौक येथे चोरीतील मोबाईल विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी खात्रीशीर माहिती एलसीबीला मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडील अंमलदार यांनी सापळा रचून विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता कोरेगाव शहरातील विविध ठिकाणी घरात प्रवेश करुन मोबाईल चोरी केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून सॅमसंग, ओपो, रेडमी असे एकुण 30 हजार किंमतीचे 3 मोबाईल मिळून आले. 

याबाबत कोरेगाव पोलीस ठाणे येथे खात्री केली असता कोरेगांव पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हा दाखल असल्याचे समजले. त्यामुळे पुढील तपासासाठी विधीसंघर्ष बालकास कोरेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनाप्रमाणे एलसीबीचे सपोनि आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार जोतिराम बर्गे, हवालदार सुधीर बनकर, पो. ना. साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, गणेश कापरे, अमित सपकाळ, पो. कॉ. केतन शिंदे, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, चालक संजय जाधव यांनी केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!