
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 09 जानेवारी 2024 | फलटण | क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्रांती मध्ये मोलाची साथ देणाऱ्या मुस्लिम समाजातील पहिली शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंती निमित्त फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष बापूराव शिंदे, सामाजिक कार्यकर्ते गोविंद भुजबळ, विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते अमिरभाई शेख, संत सावतामाळी मंदिर ट्रष्टचे संचालक विजय शिंदे, रणजित भुजबळ कोळकीचे तंटामुक्ती अध्यक्ष पै. दत्तानाना नाळे, किरण राऊत, अल्ताब पठाण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
