महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आमदार जयकुमार गोरेंच्याकडून फलटणमध्ये अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. १२ एप्रिल २०२३ । फलटण । भारतीय समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष व आमदार जयकुमार गोरे यांनी मंगळवार दि. ११ रोजी रात्री उशिरा फलटण येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विडणीचे सरपंच सागर अभंग, कोळकीचे युवा नेते संदीप नेवसे, उद्योजक बाळासाहेब ननावरे, माधव जमदाडे, आशिष घनवट यांच्यासह महात्मा जोतीराव फुले फलटण जयंती उत्सव समितीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!