शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विनम्र अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि.२३ जानेवारी २०२२ । मुंबई । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान, महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत संघर्ष केला. विचार आणि उच्चारांमध्ये सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले ते नेते होते. प्रतिभाशाली कलावंतापासून महान राजकीय नेतृत्वापर्यंतचा त्यांचा प्रवास हा त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची साक्ष देणारा आहे. बाळासाहेबांनी त्यांच्या वक्तृत्वं, नेतृत्वं, कर्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं. त्यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवणं आणि संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार करणं हीच स्वर्गीय बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय बाळासाहेबांचे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करुन अभिवादन केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!