
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२१ | मुंबई | स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी सभापतींचे सचिव महेंद्र काज, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि म.वि.स. जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
