
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सतोबा देवाची यात्रा मिती, अश्विन शुद्ध एक, रविवार, दि. १५ ऑक्टोबर २०२३ ते मिती, अश्विन शुद्ध दशमी मंगळवार, दि. २४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे.
त्यानिमित्ताने दैनंदिन कार्यक्रमामध्ये रात्री ९ वाजल्यापासून ते पहाटे ४ वाजेपर्यंत गजीनृत्य व देवाच्या ओव्या होतील.
रविवार, दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता घटस्थापना, सोमवार, दि. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी पहाटे ६ वाजता छबिना सायंकाळी ४ वाजता कुस्त्यांचे जंगी मैदान, मंगळवार, दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी पहाटे ५ वाजता ‘श्रीं’ची महाआरती, सकाळी ५ वाजता पालखीतून भव्य मिरवणूक, रात्री ९ वाजता श्री सतोबा देवाची भाकणूक होणार आहे.
या सर्व कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थ मंडळ व चेअरमन विश्वस्त श्री देवस्थान टाकेवाडी, ता. माण, जि. सातारा यांनी केले आहे.
