
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा दि.२९: माहे एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 31 मार्च 2020 रोजी होणार होत्या. राज्य निवडणूक आयोगाने कोविड-19 या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम 17 मार्च 2020 रोजी स्थगित केला. या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र भरतेवेळी निवडणूक खर्चासाठी बँक खाते उघडले असल्यास त्याच खात्यातून खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी कळविले आहे.
