स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सातारा शहाराच्या वाहतुकीची समस्या ग्रेड सेपरेटरमुळे सुटेल आणि शहाराच्या वैभवात भर पडेल – सभापती रामराजे नाईक निंबाळकर

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 29, 2021
in सातारा जिल्हा
ADVERTISEMENT

स्थैर्य , सातारा , दि .२९: सातारच्या वाहतुकीतील अनेक वर्षांची समस्या या ग्रेड सेपरेटरमुळे सुटणार आहे. या ग्रेड सेपरेटरची देखभाल व्यवस्था उत्तम करावी, जेणे करून स्वच्छता राहील आणि शहाराच्या वैभवात भर पडेल असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

पोवई नाका सातारा येथील ग्रेड सेपरेटरचे लोकार्पण विधान परिषदेचे सभापती श्री. नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, अधिक्षक अभियंता सं.गो. मुंगीलवार, कार्यकारी अभियंता संजय दराडे, सुनिल माने आदी उपस्थित होते.
सातारा शहरातील नविन नागरी सुविधा ग्रेड सेपरेटरच्या माध्यमातून मिळणार आहे. पोलिस विभागाच्या माध्यमातून या ग्रेड सेपरेटरमध्ये लोकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ठिकाणी सी सी टि.व्ही कॅमेरे लावावेत. केंद्र शासनाने व राज्य शासनाने ग्रेडसेपरेटरला निधी दिल्याबद्दल त्यांचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले.

यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, अलिकडच्या काळात वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतुकीच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यातूनच ग्रेड सेपरेटरची संकल्पना पुढे आली. केंद्र शासनाने 60 कोटी व राज्य शासनाने 16 कोटी दिले आहेत. ग्रेडसेपरेटरचे काम चांगल्या पध्दतीने झाले असून देखभाल व दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचना सातारा नगरपरिषदेला दिल्या आहेत. ग्रेडसेपरेटरमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सी सी टि.व्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. याचे नियंत्रण पोलिस विभागाबरोबरच स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मोठे स्क्रिन लावण्यात व्यवस्था करावी. यामुळे आतील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. सध्या कोरोना पॉझिटिव्हचा रेट कमी झाला असला तरी धोका टळलेला नाही. यामुळे नागरिकांनी राज्याने तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे सांगून जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना न्याय देण्याचे काम राज्य शासन करीत असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

यावेळी शंभूराज देसाई म्हणाले, मुंबईनंतर मोठे ग्रेडसेपरेटरचे काम आपल्या सातारा शहरात झाले आहे ही आपल्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. या ग्रेड सेपरेटरचे देखभाल आतील सुरक्षा या दृष्टीने काम केले पाहिजे. ग्रेड सेपरेटरमुळे शहरातील गर्दी टाळण्यास मोठा उपयोग झाला आहे. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, ग्रेड सेपरेटरमधून जाताना वाहतुकीचे नियम पाळावेत तसेच ग्रेड सेपरेटरच्या देखभाल व दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात यावी , अशी सूचना त्यांनी यावेळी केली. या कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


ADVERTISEMENT
Previous Post

गोवे ग्रामपंचायतीवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाचा झेंडा भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने विरोधी पॅनेलचा ११- ३ उडवला धुव्वा

Next Post

90 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु

Next Post

90 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्या

Phaltan : फलटण – पंढरपूर रोडटच ३० गुंठे जागा भाड्याने देणे आहे

February 27, 2021

तुमची मुलं फोनवर नेमकं काय पाहतात?, पालकांना ठेवता येणार नजर; YouTube चं नवं फीचर करणार मदत

February 27, 2021

नियम मोडणाऱ्यांना महिला शिकवणार धडा

February 27, 2021

राज ठाकरे विनामास्क पोहचले मनसे स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमात

February 27, 2021

रेखा जरे हत्या प्रकरणात 5 आरोपींविरुद्ध आरोपपत्र, फरार बोठेविरोधात स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र

February 27, 2021

कराडच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केली AC असणारी पीपीई किट, उन्हाळ्यात ठेवेल कूल-कूल

February 27, 2021

चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल, बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी किशोर वाघ यांची होणार चौकशी

February 27, 2021

संघटित गुन्हेगारी संपवण्यासाठी ‘मोक्का’ लावणार : पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल

February 27, 2021

संजय राठोड यांच्यासोबत चित्रा वाघ यांचा फोटो मॉर्फ, आक्षेपार्ह फोटोवरुन वाघ यांचे टीकास्त्र

February 27, 2021

भुमिअभिलेखच्या लाचखोर लिपिकाला चार वर्षे सक्तमजुरी

February 27, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.