स्थैर्य, फलटण दि.५ : राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचा राज्यमंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय अभिनंदनीय असून फलटणमध्ये या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते हरिष काकडे यांनी केली आहे.
- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -
टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज
याबाबत बोलताना हरिष काकडे म्हणाले की, राज्याची वस्त्यांची जातीवाचक नावे रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय स्तुत्य आहे. सदर निर्णयानुसार फलटण शहरातील तेली गल्ली, कुंभारटेक, खाटीक गल्ली, ढोर गल्ली, ब्राह्मण गल्ली, सणगर गल्ली आदी नावे बदलून या वस्त्यांना महापुरुषांची नावे देण्यात यावी. आपण यापूर्वीच याबाबत प्रांताधिकार्यांना निवेदन दिले होते मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते असे सांगून आता शासन निर्णयानुसार वस्त्यांची नावे बदलताना मतदार याद्यांमधूनही पत्त्यांचा जातीवाचक उल्लेख वगळण्यात यावा, अशीही मागणी हरिष काकडे यांनी केली आहे.