
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 25 सप्टेंबर 2024 | फलटण | प. पू. गोविंद महाराज उपळेकर यांच्या ५० व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मंगळवार दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी विविध कार्यक्रम संपन्न झाले. भाविक भक्तांनी दिवसभर प. पू. गोविंद महाराज उपळेकर यांच्या फलटण येथील समाधी मंदिरात उपस्थित राहून दर्शन घेतले. यासोबतच अनेक भक्त हे प. पू. गोविंद महाराज उपळेकर यांच्या पुण्यतिथी उत्सव कार्यक्रमात सहभागी झाले होते.
प. पू. गोविंद महाराज उपळेकर पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने संपन्न झालेले कार्यक्रम :
-
सकाळी ५.०० ते ७.०० : काकडा, अभिषेक पूजा, आरती. इ.
-
सकाळी ७.०० ते ९.०० : लघुरुद्र
-
सकाळी ९.०० ते ९.३० : श्री गीता पठण, पसायदान व श्री ज्ञानेश्वरी पारायण सांगता
-
सकाळी ९.३० ते १२.१५ : सौ. मिताली कातरणीकर – प्रभुणे, मुंबई यांचे भक्तीगीत गायन, तबला – अनिकेत देशपांडे, हार्मोनियम – नेरकर सर
-
दुपारी १२.१५ वा. : ‘श्रीं’ची माध्यान्ह आरती
-
दुपारी १२.३० ते ३.०० : महाप्रसाद
-
दुपारी ४.०० ते ६.०० : ह.भ.प. कमलाकर महाराज भादोले, निमसोड (खटाव) यांचे फुलांचे किर्तन
-
सायं. ६.१० वा. : ‘श्रीं’चे फुलांचा कार्यक्रम व पालखी सोहळा (नगर प्रदक्षिणा)
-
सायं. ७.०० वा. : ‘श्रीं’ची आरती
-
रात्री ९.३० वा. : ‘श्रीं’चा हरिपाठ
प. पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्थेच्या वतीने शिस्तबध्द नियोजन करण्यात आले होते.
