
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०५ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विजयादशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
विजयादशमीचा सण दुष्प्रवृत्तीवरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो, हा संदेश या सणाच्या माध्यमातून अधोरेखित होतो.
यंदाची विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, आरोग्य व भरभराट घेऊन येवो या अपेक्षेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
