
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि.०२ एप्रिल २०२२ । मुंबई । राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
रमजानचा पवित्र महिना उपवास, प्रार्थना,दानधर्म तसेच परोपकाराचे महत्व अधोरेखित करतो. ईद उल फित्र (रमजान ईद) सणानिमित्त मी राज्यातील नागरिकांना, विशेषतः मुस्लिम बंधु -भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, शांती व समृध्दी घेऊन येवो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.



