
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, मुंबई, दि.२१: नाशिक येथे ऑक्सिजन टाकीतून प्राणवायू गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत करोना रुग्णांच्या झालेल्या जीवितहानी बद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे ऑक्सिजन टाकीतून गळती होऊन काही निरपराध कोरोना रुग्ण दगावल्याचे समजून तीव्र दुःख झाले. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना आपल्या शोक संवेदना कळवतो व बाधित व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.



