
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑक्टोबर २०२४ | फलटण |
दीपावलीतील पहिला दिवस वसुबारस, गोमातेच्या पूजनाने संपन्न झाला. फलटण येथील झिरपवाडीमध्ये असणार्या ओम परमपूज्य परमहंस श्री सद्गुरु यशवंतबाबा गोपालन संस्था या संस्थेमध्ये वसुबारसनिमित्त गोमातेचे पूजन कार्यक्रम आयोजित केला होता.
फलटण, बारामती व आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी वर्ग, गोप्रेमी, गोसेवक, गोरक्षक असा सर्व समाज गोमाता व वासराच्या पूजनासाठी गोशाळेमध्ये उपस्थित होता.
ही संस्था गेली दहा वर्षे गोसंगोपन, गोसंवर्धन व गोरक्षण या कार्यामध्ये अग्रेसर असून गोमाता ही राजमाता घोषित झाल्यामुळे वसूबारसनिमित्त या कार्यक्रमांमध्ये सर्व उपस्थित मान्यवरांनी, गोप्रेमींनी गोमातेचे पूजन करून अभिनंदन केले.
संस्थेचे अध्यक्ष सदाशिव कुंभार यांनी सर्वांचे आभार मानले.
