गोपीनाथ गावडे पाटील यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ९ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण तालुक्याच्या पूर्वभागातील गवळीनगर (गोखळी, ता. फलटण) येथील गोपीनाथ कृष्णा गावडे पाटील (६९) यांचे हृदयविकाराच्या आजारपणामुळे निधन झाले.

श्रीराम सहकारी साखर कारखान्यामध्ये प्रदीर्घ सेवेनंतर ८ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. ‘नाना’ या नावाने ओळखले जात. त्यांचा शांत, संयमी स्वभाव होता. त्यांचा धार्मिक, सामाजिक कार्यात सहभाग होता.

गोखळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, हॉटेल अष्टविनायक, अष्टविनायक फर्टीलायझरचे प्रोप्रा. नवनाथ गावडे यांचे ते वडील होत.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, तीन विवाहित मुली, भाऊ, भावजय, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेमध्ये सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक व विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. गोखळी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!