गुड थॉट्स : सुप्रभात….आज १० फेब्रुवारी… चिवटपणा हाच जीवंतपणा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


चिकाटी हा फार छोटा शब्द आहे, पण ज्याच्या आयुष्याला चिकटतो त्याचं सोन करतो.जीवनात माणसाने चिकाट नसाव पण चिकाटीने ध्येय गाठणारे व्यक्तीमत्व आसावे.घोरपडीच्या चिकाटीने कोंढाणा सर करता आला.खरंच घोरपडीला बारा बैलांची जोडी लावली तरी ती तूसभर जागा सोडत नव्हती.कारण तिच्यातला चिवटपणा तिला जगण्याची उर्मी देत होता.तस तिला जगण्याच बळ मिळत होत.

नव्या पिढीने सुद्धा ध्येयपासून विचलत न होता.अंगी चिवटपणा बाळगल्यास यश निश्चितच आहे.पण सध्याच्या धावपळीच्या व प्रलोभनाच्या दुनियेत चिवटपणा टिकून रहाण्यास फार महत्प्रय कार्य करावे लागते.त्यासाठी ध्येय निश्चित ,आत्मविश्वास ,जिद्द ,कष्टमय तयारी,झोकून देण्याची वृत्ती असल्यास चिवटपणातूनच यश प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो.लोकसेवा व राज्यसेवा परीक्षेत मराठी तरुणाईचा झेंडा फडकविण्यासाठी अंगी अभ्यासरुपी चिवटपणा ठेवल्यास पुन्हा एखदा अटकेपार मराठी निशाण फडफडणारच.

चिवटपणा नसानसात भिनल्यास अशक्य शक्य करी

आपलाच चोखदंळ प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!