सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी ५ हजारांनी स्वस्त, जाणून घ्या प्रमुख शहरांतील ताजे भाव

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सराफा बाजारात गेल्या २४ तासांत चांदीच्या दरात प्रति किलो ५ हजार रुपयांची मोठी घसरण झाली असून सोन्याचे भावही उतरले आहेत. मुंबई, पुणे आणि नाशिकसह प्रमुख शहरांतील २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे ताजे दर जाणून घ्या.

स्थैर्य, सातारा, दि. १७ नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सुरू असलेल्या चढ-उतारानंतर ग्राहकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. चांदीच्या दरात प्रति किलो ५ हजार रुपयांची घसरण झाली असून प्रति ग्रॅम दर १८९.९० रुपयांवर आला आहे. १६ नोव्हेंबर रोजी १ लाख ९४ हजार ९०० रुपये प्रति किलो असलेली चांदी आता १ लाख ८९ हजार ९०० रुपये झाली आहे.

२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दरही घटले

चांदीसोबतच सोन्याच्या दरातही घट नोंदवली गेली आहे. मागील दिवसाच्या तुलनेत २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात ८२० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात ७५० रुपयांची घसरण झाली आहे. नवीन दरानुसार २४ कॅरेट सोने १ लाख ३६ हजार ७९० रुपये, २२ कॅरेट १ लाख २५ हजार ३९० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २ हजार ५९० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे.

प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर२२ कॅरेट२४ कॅरेट१८ कॅरेट
मुंबई₹१,२५,३९०₹१,३६,७९०₹१,०२,५९०
पुणे₹१,२५,३९०₹१,३६,७९०₹१,०२,५९०
नागपूर₹१,२५,३९०₹१,३६,७९०₹१,०२,५९०
नाशिक₹१,२५,४२०₹१,३६,८२०₹१,०२,६२०
दिल्ली₹१,२५,५४०₹१,३६,९४०₹१,०२,७४०
जयपूर₹१,२५,५४०₹१,३६,९४०₹१,०२,७४०
सुरत₹१,२५,४४०₹१,३६,८४०₹१,०२,६४०
चेन्नई₹१,२५,३९०₹१,३६,७९०₹१,०२,५९०

वरील सोन्याच्या दरांमध्ये जीएसटी (GST), टीसीएस (TCS) आणि घडणावळ शुल्काचा समावेश नाही. त्यामुळे प्रत्यक्ष दागिने खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफांकडून अंतिम दरांची खात्री करून घ्यावी.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!