
थेट WhatsApp वर मिळवा
सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून सोन्याच्या दरात घसरण झाली आहे, तर चांदी महागली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०४ ऑक्टोबर : सणासुदीच्या काळात सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ४ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली असून, चांदीच्या दरात मात्र वाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ३६ हजार ७५० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४९ हजार १८० रुपये इतका झाला आहे.
सोन्याचे दर घसरले
३ ऑक्टोबरच्या तुलनेत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ३ ऑक्टोबर रोजी २२ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी १ लाख ३७ हजार ७६० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ५० हजार २९० रुपये होता. एकाच दिवसात २२ कॅरेट सोन्याच्या दरात १ हजार १० रुपयांची, तर २४ कॅरेट सोन्याच्या दरात १ हजार ११० रुपयांची कपात झाली आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी १ लाख ११ हजार ८९० रुपये आहे. दरम्यान, चांदीच्या दरात वाढ झाली असून दर २ लाख ३५ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
शहरानुसार प्रमुख दर
मुंबई, पुणे, कोलकाता, नागपूर आणि बंगळुरूमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३६ हजार ७५० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४९ हजार १८० रुपये आहे. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३६ हजार ७८० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४९ हजार २१० रुपये आहे. दिल्ली, जयपूर व लखनौमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३६ हजार ९०० रुपये, तर २४ कॅरेटचा दर १ लाख ४९ हजार ३३० रुपये नोंदवला गेला आहे.





