
थेट WhatsApp वर मिळवा
सराफा बाजारात सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १,४८० रुपयांची वाढ झाली असून २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२६,५६० रुपयांवर पोहोचला आहे, तर चांदीचा दर स्थिर आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २३ नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सुरू असलेल्या घसरणीला अखेर ब्रेक लागला असून दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. ताज्या बाजारभावानुसार सोन्याच्या किमतीत प्रति तोळा १ हजार ४८० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या दरवाढीमुळे २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख २६ हजार ५६० रुपयांवर पोहोचला आहे. लग्नसराईचा हंगाम जवळ येत असल्याने दागिन्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची चिंता या वाढीमुळे वाढली आहे.
२४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे ताजे दर
सराफा बाजारातील ताज्या दरपत्रकानुसार २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव १२ हजार ६५६ रुपये, ८ ग्रॅमचा भाव १ लाख १ हजार २४८ रुपये, तर १० ग्रॅमचा भाव १ लाख २२ हजार ५६० रुपयांवरून वाढून १ लाख २६ हजार ५६० रुपये झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा विचार करता १ ग्रॅमसाठी ११ हजार ६०० रुपये आणि १० ग्रॅमसाठी १ लाख १६ हजार रुपये मोजावे लागत आहेत. तसेच १८ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा दर ९ हजार ४९१ रुपये आणि १० ग्रॅमचा दर ९४ हजार ९१० रुपये इतका नोंदवला गेला आहे.
चांदीचे दर स्थिर; ग्राहकांचे बाजाराकडे लक्ष
सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असली, तरी चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मागील आठ दिवसांत चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले होते, मात्र सध्या १०० ग्रॅम चांदीचा भाव १७ हजार ५०० रुपयांवर स्थिर आहे. सोन्याची वाढती किंमत आणि चांदीचे स्थिर दर यामुळे सराफा बाजारातील पुढील घडामोडींकडे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.



