
थेट WhatsApp वर मिळवा
बदलत्या काळात केवळ पदवीऐवजी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकासाची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्हासनगर येथील कार्यक्रमात स्पष्ट केले.
स्थैर्य, सातारा, दि. २३ नोव्हेंबर : बदलत्या जगात केवळ कागदी पदवी मिळवण्यापेक्षा त्यासोबत उपयोजित ज्ञान आणि प्रत्यक्ष कौशल्याची जोड असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उल्हासनगर येथील एचएसएनसी संस्थेने कौशल्य विकासासाठी उभारलेल्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या भारतात असून या तरुण पिढीला योग्य कौशल्य प्रशिक्षण दिल्यास भारत संपूर्ण जगासाठी कुशल मनुष्यबळ पुरवू शकेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकल्पांची घोषणा
या कार्यक्रमात फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी राज्य सरकार राबवत असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची माहिती दिली. शहरासाठी मेट्रो कनेक्टिव्हिटी, काँक्रीट रस्ते, उड्डाणपूल आणि स्वतंत्र पाणीपुरवठा योजना यांसारख्या कामांना गती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितल.



