पुढील दिवाळीपर्यंत सोन्यात 20% जास्त परताव्याची आशा, 9 वर्षांत दिवाळीत सोने सर्वाधिक वधारले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, दि.१: जागतिक अनिश्चिततेचे वातावरण, कोविड- १९ची दुसरी लाट व गुंतवणुकीच्या इतर साधनांच्या तुलनेत सोन्यात वेगाने तेजी आल्याने दिवाळीनिमित्त सुवर्ण बाजारात उत्साह परतला आहे. मागील दिवाळीच्या तुलनेत सध्या सोन्याचा भाव सुमारे ३२ टक्के जास्त आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव १० ग्रॅमला ५०६९९ रुपये आहे. सोन्याच्या भावातील ही वाढ २०११ नंतर सर्वाधिक आहे. २०१०च्या तुलनेत २०११ मध्ये सोन्याने दिवाळीत ३८ टक्के परतावा दिला होता. तज्ज्ञांनुसार सोन्यातील ही तेजी तात्पुरती नसून येत्या दोन वर्षात सोन्याच्या दरात लहानमोठी घट वगळता तेजी कायम दिसेल. पुढील दिवाळीपर्यंत सोन्याच्या भावात १८ ते २० टक्के तेजी दिसून येईल. म्हणजे या दिवाळीत गुंतवणूक करणाऱ्यांना पुढील दिवाळीत २० टक्क्यांपर्यंतचा परतावा मिळू शकतो. सोन्याच्या तेजीमुळे केवळ फिजिकल गोल्डमध्येच नव्हे तर गोल्ड ईटीएफ व गोल्ड बाँडमध्येही गंुतवणूक वाढत आहे. नवरात्र ते दिवाळीपर्यंत देशात सुमारे शंभर टन सोन्याचा व्यवसाय होण्याची व्यावसायिकांना आशा आहे.

रिद्धी-सिद्धी बुलियनचे एमडी व इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांनी सांगितले की, गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्याचे भाव सुमारे ४० टक्के वाढले असले तरी सण व लग्नाच्या हंगामात दुकानांवर गिऱ्हाईक वाढू लागले आहेत. कशा प्रकारची मागणी जास्त आहे असे विचारल्यावर जगातील सर्वात मोठ्या गोल्ड रिफायनरीचे मालक आणि राजेश एक्स्पोर्ट्सचे अध्यक्ष राजेश मेहता म्हणाले की, आंतरराष्ट्रीय वातावरण आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायामुळे सोन्याची मागणी वाढत आहे. ईटीएफ तसेच बिस्किट, नाणी, दागिन्यांची मागणी वाढत आहे. मेहता यांनी सांगितले की, सामान्यत: देशात दरवर्षी ८००-९०० टन सोन्याचा व्यवसाय होतो. नवरात्र ते दिवाळीपर्यंत महिन्यात सुमारे २० टक्के व्यवसाय होत आहे. सध्या गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास ७० टक्के व्यवयाय सुरळीत झाला आहे. यामुळे देशात एक महिन्यात सुमारे शंभर टन सोन्याच्या व्यवसायाची आशा आहे.

सोन्यातील तेजीचा फायदा गोल्ड ईटीएफलाही झाला आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियानुसार ३० सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत एकूण २४२६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. जी गेल्या वर्षातील तिमाहीच्या १७१ कोटीच्या तुलनेत १४ पट जास्त आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२० पर्यंत एकूण ५९५७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. कमोडिटी एक्स्पर्ट व केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया म्हणतात, तेजीची सायकल जवळपास चार वर्षांची असते. म्हणून दोन वर्षे सोने तेजीत आहे आणि ही तेजी अजून दोन वर्षे राहील. केडिया सांगतात की, जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करत असाल तर सध्याच्या स्थितीच्या दृष्टीने काही नकारात्मक गोष्टींकडेही लक्ष द्यायला हवे. यामुळे सोन्याच्या दरात घटही येऊ शकते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!