उद्योजकांनी बदलत्या काळाशी जुळवून घेण्याची गरज – रतन टाटा


 

स्थैर्य, मुंबई, दि.१: जग झपाटय़ाने बदलत असून,
उद्योजकांनी बदलत्या काळाशी आणि गरजांशी जुळवून घेणे आवश्यक आहे, असे
प्रतिपादन प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी केले. ‘टेकस्पार्क्‍स २०२०’
कार्यक्रमात ‘काळानुरूप विकसनशील देशांतील बदलत्या गरजा’ या विषयावर
त्यांनी शनिवारी उद्योजकांना मार्गदर्शन केले.

दूरचित्रसंवादाद्वारे रतन टाटा
‘टेकस्पार्क्‍स २०२०’ या कार्यक्रमात सहभागी झाले. ‘नवोन्मेष आणि सृजनशीलता
हे उद्योगजगताचे आधारस्तंभ असले तरी, उद्योजकांना देशाच्या बदलत्या
गरजांशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने वेळोवेळी योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे
आहे’, असे मत त्यांनी मांडले.

भारत आणि जगातील प्रमुख समस्यांवर प्रकाश
टाकताना त्यांनी मानवतावादाचा संघर्ष, उपासमार आणि जागतिक अन्न तुटवडा
यांवर भाष्य केले. तसेच अवकाशयुगीन आणि अन्य प्रगत तंत्रज्ञानाचा व्यवसाय
वाढीसाठी वापर केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

आपण जो व्यवसाय करतो तो केवळ एका
देशापुरता मर्यादित नसून, जगाच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करीत
असतो. त्या अनुषंगाने प्रत्येकाचे वर्तन आणि आचरण असले पाहिजे. ‘नम्रता’ हा
व्यवसाय वाढीचा मूलमंत्र आहे. केवळ मूल्यनिर्मितीसाठीच नव्हे, तर मानव
कल्याणासाठी आपण कोणत्या प्रकारे योगदान देऊ शकतो, याचा प्रत्येकाने विचार
केला पाहिजे


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!