गोडोलीकरांना नव्या संसर्गाची धास्ती


स्थैर्य, सातारा, दि. 24 : पालवी चौक ते गोळीबार मैदान रस्त्यावर त्रिमूर्ती कॉलनीतील ९ कुटुंबाने मैलायुक्त सांडपाणी सोडून दिले आहे. गेली ६ वर्षे या सांडपाण्याने परिसरातील नागरिक आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना दुर्गंधीचा प्रचंड त्रास होत असून संबंधितांच्यावर कारवाई करावी.

गोडोलीकरांना  करोनापेक्षा मैलायुक्त सांडपाणीच्या नव्या संसर्गाची धास्ती वाढल्याने प्रशासनाकडे सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांनी लेखी तक्रार केली आहे. सर्वत्र  करोनाचा कहरच वाढत असल्याने प्रशासनाने लाँकडाऊन करून संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गोडोलीतील पालवी चौक ते गोळीबार मैदान रस्त्यावर सर्व्हे नंबर १२/२/क त्रिमूर्ती कॉलनी येथील सुशिक्षित असलेल्या ९ कुटुंबाचे सांडपाणी गेली ६ वर्षांपासून सोडले आहे. परिसरातील नागरिकांना या सांडपाण्याच्या दुर्गंधीचा प्रचंड नाहक त्रास होत आहे. रस्त्यावर शालेय विद्यार्थी, नोकरदार, नागरिकांची मोठी वर्दळ असून येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा त्रास होतो. याबाबत अनेकांनी वारंवार रमेश महादेव देशमुख, पद्मा अनिल भूतकर, विजय गोविंद कुबडे, माणिक सदाशिव जगताप, हणमंत विष्णू कोळेकर, राजू रामचंद्र सकपाळ, सचिन संपत पाटील, चंद्रकांत व्यंकटराव भुईटे या ९ कुटुंबाना सांगितले असता सांगणाऱ्यांना ही मंडळी उध्दटपणे बोलून पाणउतारा करतात.

करोना पेक्षा या सांडपाण्याच्या संसर्गाची धास्ती या परिसरात वाटू लागली आहे. म्हणून सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांनी थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!