निंबळक येथे मुलीवर बलात्कार; एकावर गुन्हा दाखल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २ मार्च २०२३ | फलटण |
निंबळक (ता. फलटण) येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला असून या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी रूपेश शरण्या भोसले (मूळ रा. कोर्हाळे, ता. बारामती, जि. पुणे, सध्या रा. निंबळक, ता. फलटण) याच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फलटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २१ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रौ ११.३० वाजण्याच्या सुमारास निंबळक (ता. फलटण) येथे आरोपी रूपेश शरण्या भोसले (रा. निंबळक, ता. फलटण) याने माझ्या मुलीला ‘माझे घरी चल,’ असे म्हणून सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मुलगी दीपाली हिस घरी नेले. त्यानंतर रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास मुलगी दीपाली, तिच्या बाजूला माझी नणंद व तिच्या बाजूला नदावा रूपेश असे झोपले होते. त्यानंतर रात्री ११.३० वाजता मुलगी दीपाली ही झोपेत असताना तिचे अंगावर माझा नंदावा रूपेश येवून झोपला व त्याने तिचे तोंड दाबले आणि तिची कपडे काढली व नंतर मुलगी दिपाली हिचे इच्छेविरुद्ध बलात्कार केला. अशी तक्रार पीडितेच्या आईने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रूपेश भोसले याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक डी. सी. गोडसे करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!