दैनिक स्थैर्य | दि. ३ मे २०२३ | फलटण |
कॉलेजला जात असताना एका युवतीचा सांगवी येथे एकाने विनयभंग केल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अमित चंद्रकांत निकाळजे (रा. सोनगाव, तालुका फलटण, जिल्हा सातारा) यास ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. १५ फेब्रुवारी २०२३ ते दि. ३० एप्रिल २०२३ दरम्यान फिर्यादी युवती ही कॉलेजला जात असताना वाघाचीवाडी, सांगवी येथे आरोपी अमित निकाळजे याने पाठीमागून येऊन फिर्यादी युवतीचा हात धरून ‘तू मला जास्त आवडतेस, तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहा’, असे म्हणून त्याने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच ‘तू जर माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहिली नाहीस तर तुझे फोटो मी इंस्टाग्रामवरती टाकीन’, अशी धमकी देऊन युवतीकडे पाहून फिरत होता, अशी तक्रार युवतीने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अमित चंद्रकांत निकाळजे (रा. सोनगाव) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून त्यास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. दीक्षित करत आहेत.