जुगार अड्ड्यावर छापा, 82 हजार जप्त


 

स्थैर्य, सातारा, दि. २२: येथील शनिवार पेठेतील सावकार ट्रान्सपोर्टच्या पाठीमागील ओढ्यालगतच्या मोकळ्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून 82 हजार 680 रुपये रोख, 4 मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, शनिवार पेठेतील सावकार ट्रान्सपोर्टच्या पाठीमागील ओढ्यालगत एक मोकळे शेड आहे. याठिकाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली. त्याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी जुगार खेळल्याप्रकरणी पोलिसांनी अब्बास कादर मुलाणी वय 60 वर्षे रा. लिंब, ता. सातारा, समर महमदखान पठाण वय 40 रा. शनिवार पेठ, सातारा, सत्येंद्र जयसिंग घाडगे वय 45 रा. सावकार ट्रान्सपोर्टच्या पाठीमागे, दादा बाळू अवघडे वय 40 रा. शनिवार पेठ, गणेश सुभाष खवळे वय 31 रा. गुरुवार पेठ, सातारा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या छाप्यात पोलिसांनी रोख रक्कम 82 हजार 680, चार मोबाईल व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!