दैनिक स्थैर्य | दि. २८ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमा अंतर्गत ‘टी’ आकाराचे कलम करण्याचे प्रात्यक्षिक दिले.
कृषीकन्या सिद्धी शेटे, साक्षी जाधव, समृद्धी जगताप, सिद्धिका कांबळे, स्वेजल पाटील, प्रियांका शिंदे, प्रियांका भोसले व श्वेता सस्ते यांनी गुलाबाच्या रोपावर हे ‘टी’ आकाराचे कलम करून दाखवले. याअंतर्गत त्यांनी या प्रात्यक्षिकासाठी लागणारे साहित्य जसे की कलम चाकू, सिकॅटर, कलम करण्यासाठी वापरलेले गुलाबाचे रोप, वंशज, निवडलेल्या गुलाबाच्या कांडीचा कोंब, पॉलिथिन स्ट्रीप इत्यादींची माहिती सविस्तररित्या शेतकर्यांना दिली. तसेच कृषीकन्यांनी हे कलम करण्याची पद्धतशीर माहिती सांगितली. याअंतर्गत रूट स्टॉक रोपावर ‘टी’ आकाराचा स्लीट बनवला जातो व त्या स्लीटमध्ये वंशज निवडलेल्या गुलाबाच्या कांडीचा कोंब पॉलीथीन स्ट्रिपच्या सहाय्याने जोडला जातो, ही माहिती सविस्तररित्या सांगितली.
तसेच त्यांनी ‘टी’ आकाराच्या कलमाचे फायदे, जसे की नवीन जातीचे रोप तयार करणे, कोणत्याही एका जातीच्या गुलाबाची वैशिष्ट्य की जी त्याची गुणवत्ता वाढवतील ती दुसर्या जातीच्या गुलाबामध्ये प्रेरित करणे इ. शेतकर्यांना पटवून सांगितले. या उपक्रमास शेतकर्यांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित, प्रा. संजय अडत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.