
दैनिक स्थैर्य । दि. १८ नोव्हेंबर २०२२ । फलटण । ‘‘डॉक्टर, डॉक्टर, इकडे जरा बघा हो… माझा हा हात वर जात नाही…. मागे वळवता येत नाही…… खूप वेदना होत आहेत……; कसेही करून हा माझा त्रास कमी करा.’’ या तोंडी तक्रारींबरोबर संबंधित रुग्ण आपले एक्सरे रिपोर्ट दाखवतो. त्यांत मानेच्या व पाठीच्या कांही मणक्यांत दोष असतो. मानेचे व पाठीचे वरचे पाच सहा मणके दबलेले चिकटलेले, एकावर एक चढलेले किंवा त्यांतील अंतर खूप कमी झालेले असते. कांही वेळा हाताच्या बोटांना मुंग्या येत असतात. अशा वेळेस आधुनिक वैद्यक तज्ज्ञ वेदनाशामक गोळ्या घ्यावयाचा सल्ला देतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटते पण रोग पूर्णपणे बरा होत नाही. या तक्रारीकरिता फिजिओथेरपी एक्सससाईझ बराच गुण देतात.
रुग्णांवर उपचार करणं आणि परिणाम साधणं हे अंधाऱ्या खोलीमध्ये एखादी वस्तू शोधण्यासारखं आहे. जोपर्यंत तुम्हाला त्या खोलीत प्रकाश मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही खोलीतील सर्व वस्तू चाचपडत राहता. हेच तत्त्व खांदेदुखीच्या रुग्णांबाबतही लागू होतं. जितक्या लवकर तुम्हाला आजाराचे अचूक निदान होते. तितक्या लवकर त्या परिस्थितीवर योग्य उपचार घेणं तितकंच सोपं जातं.
फ्रोजन शोल्डरमध्ये आपल्या खांद्याभोवती असलेल्या मृदू पेशी वेगवेगळ्या अवस्थांतून जाताना कडक होतात किंवा गोठतात.हे एका रात्रीत घडत नाही तर ते तीन वेगवेगळ्या टप्प्यांमधून घडत जातं.सुरुवातीचा टप्पा हा खरच वेदनादायी असतो आणि हालचाल रोखली जाते. त्यानंतरचा टप्पा ज्यात गोठवणुकीची प्रक्रिया होते, वेदना संपतात आणि हालचाल खूप कमी होते.या टप्प्यांमध्ये गोलाकार हालचालींवर सर्वात जास्त परिणाम होतो. त्यामुळे केस विंचरणं, कपडे घालणं, पँटच्या मागच्या खिशात हात घालणं ही रोजची कामं आव्हानात्मक ठरतात.यानंतर असा एक टप्पा येतो, जिथं ही सर्व रचना गळून पडते आणि हालचाली सुरळीत सुरू होतात.हा प्रत्येक टप्पा सहा ते आठ महीने टिकून राहतो. त्यामुळे संपूर्ण आजारपण हे दीड ते दोन वर्षं राहतं.योग्य व्यायामाने फ्रोजन शोल्डर बरा होऊ शकतो.
फ्रोझन शोल्डरची लक्षणे
सामान्यपणे आढळणारी फ्रोझन शोल्डरची लक्षणे
• रात्री शोल्डर्स / खांदे खूप दुखणे. त्यामुळे झोप न लागणे.
• हालचाल केल्यावर आणि आराम करताना आडवे झोपल्यावर दुखणे.
• सांध्याची हालचाल कमी होणे. सांधेदुखी कमी करण्यासाठी
• एखादं काम करताना हात अधिक वर उचलता न येणं.
• स्नायूंचा कमकुवतपणा आणि कमी झालेली सहनशक्ती त्याचबरोबर स्नायूंवर आलेल्या अधिक ताणामुळे होणारा त्रास.
काम करताना होणारा त्रास:
• हात वर न उचलता येणे, बाजूला किंवा मागे न नेता येणे. त्यामुळे कपडे घालताना, काही खातानाही त्रास होतो.
• जड वस्तू उचलताना त्रास होणे.
• एखादे काम सातत्याने केल्यास त्रास होणे.
साधारणपणे कोणाला फ्रोझन शोल्डरचा त्रास होऊ शकतो?
• ज्यांचे वय ४०-६० च्या मध्ये आहे.
• मधुमेही
• फ्रॅक्चर, सॉफ्ट टिशू इंज्युरी असे काही पूर्वी झाले असेल तर.
• Osteoarthritis मुळे होणारी शोल्डरची मर्यादित हालचाल.
• Rotator cuff degeneration झालेल्याना.
नोट: लक्षात घ्या जॉईंट मोबलायझेशन(Mobilization), ड्राय निडलिंग(Dry Needling), अत्याधुनिक शॉकवेव्ज उपचार पद्धती (Advance Shock waves Treatment) ह्या आणि अश्या अनेक स्ट्रेचिंग एक्सससाईझ आहेत ज्यामुळे फ्रोझन शोल्डरच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो आणि ते कायम स्वरूपी बरे होऊ शकतात.
अथर्व फिजिओथेरपी क्लिनिक मध्ये असे एक्सससाईझ करून घेण्यासाठी डॉ. रोहन अकोलकर हे तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट आहेत त्यांच्याकडून कडून तपासणी करून त्यांच्याकडून एक्सससाईझ प्रोग्रॅम बनवून घेतला तर नक्कीच ह्याच्यावर कायमस्वरूपी उपाय ठरू शकतो.
डॉक्टरांची वैशिष्टे-
• डॉ. रोहन अकोलकर हे स्पोर्ट फिजियोथेरेपी मध्ये पीएच.डी. असणारे बारामतीमधील सर्वोत्तम डॉक्टर आहेत.
• जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या FIFA WORLD CUP 2018 रशिया मध्ये सहभाग घेणारे ते एकमेव भारतीय फिजियोथेरेपीस्ट तज्ञ डॉक्टर आहेत.
• डॉक्टरांना असणारा प्रचंड अनुभव त्याचबरोबर त्यांचे उच्च शिक्षण.
• डॉ अकोलकरस अथर्व फिजियोथेरेपी क्लिनिक मध्ये असणाऱ्या अत्याधुनिक उपकरणे आणि शास्त्रीय व्यायामाचा वापर करून उपचार केले जातात.
· जर्मन टेक्नोलॉजीच्या मशीन्स उदा. शोकवेव थेरपी उपचार पद्धती, योग्य परिणामकारक असे उच्च प्रतीचे लेझर (Class 4 Laser), PEMF Therapy उपकरणे ह्या आणि अनेक अश्या उपकरणांचा उपयोग करून मणक्यांच्या, पाठीच्या अनेक स्नायू आणि मांसपेशी यांचे दुखणे कायमचे बरे करू शकतो.
संपर्कासाठी पत्ता-
1.डी. एस. ग्रुप., पहिला मजला, आर्यमान हॉटेल च्या पाठीमागे, लक्ष्मीनगर, फलटण.-ओपीडी वेळ दु 2:00 ते सं 6:00 पर्यंत.
2.साई बालरुग्णालय, तळ मजला, रिंग रोड (S.T. Stand च्या पाठीमागे) बारामती, ओपीडी वेळ दुपारी 1:00 ते सायंकाळी 5:00 पर्यंत.
3.तांबे कमर्शीअल कॉम्प्लेक्स, सुभद्रा मॉल जवळ भिगवण रोड, बारामती- ओपीडी वेळ सायंकाळी 6:30 ते रात्री 8:30 पर्यंत.
4. डॉ ढोले कॉम्प्लेक्स, डॉ दोशी हॉस्पिटल शेजारी,पुणे सोलापूर हायवे मदणवाडी चौफुला भिगवण ओपीडी वेळ स 9:30 ते 11:30 पर्यंत.
मोबाईल नंबर-7350069955*