फलटणमध्ये आज जिओ गंडलय


दैनिक स्थैर्य | दि. 13 सप्टेंबर 2024 | फलटण | आज सकाळ पासून Jio ची मोबाईल इंटरनेट सेवा गंडली होती. साधारण दुपारी 12 नंतर फलटण शहरासह तालुक्यातील Jio कंपनीचे मोबाईल इंटरनेट सेवा वापरण्यास सर्व वापरकर्त्यांना अडचण येवू लागली होती. याबाबत वापरकर्ते हे एकमेकांना Jio इंटरनेट सुरू आहे का? असे प्रश्न उपस्थित करत होते. त्यामुळे फक्त आपल्याला प्रॉब्लेम आहे की सर्वांना आला आहे; यावर चर्चा रंगल्या होत्या.

गत काही महिन्यांपूर्वी Jio कंपनीने आपले दर वाढवले आहेत. दर वाढवलेनंतर तरी वापरकर्त्यांना चांगली इंटरनेट सेवा मिळेल; अशी अपेक्षा सर्वांना आहे. त्यामुळे कंपनीने याची दखल घेत चांगली व्हॉईस व इंटरनेट सेवा द्यावी असे मत अनेक वापरकर्त्यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!