फलटणच्या निवासी नायब तहसीलदारपदी अभिजीत सोनवणे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 13 सप्टेंबर 2024 | फलटण | इंदापूर जि. पुणे येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार (महसूल) अभिजीत सोनवणे यांची निवासी नायब तहसीलदार म्हणून फलटण तहसील कार्यालय या ठिकाणी आज बदली झाली आहे.

यापूर्वी अभिजित सोनवणे यांनी उपविभागीय कार्यालय फलटण येथे अव्वल कारकून म्हणून काम पाहिले होते. तर खंडाळा, सातारा, फलटण याठिकाणी शिरस्तेदार म्हणून सेवा बजावली आहे.

सोनवणे यांची फलटण येथे निवासी नायब तहसीलदारपदी बदली झाल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!