
स्थैर्य, फलटण, दि. २४ : फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. दि. १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सध्या कोरोनाला लढा देण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण होणे गरजेचे आहे. फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातिल १८ वर्ष पूर्ण झालेल्यांनी दि. १ मे २०२१ पासून नोंदणी करून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आमदार दीपक चव्हाण व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.
फलटण येथील मुधोजी हायस्कुल येथे फलटण उपजिल्हा रुग्णालयामार्फ़त कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस आज दि. २४ एप्रिल रोजी घेतला. या वेळी आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा सौ. निता नेवसे, मिलिंद नेवसे, महादेव माने, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, तुषार नाईक निंबाळकर, सुरेश काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आता संपूर्ण देशामध्ये कोरोना लसीकरणाचा मोठा टप्पा पार होणार आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. सरकारने हा निर्णय घेतला. यापूर्वी सर्वात आधी 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात होती. त्यानंतर 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोव्हिड 19 लस देण्यााच निर्णय सरकारने घेतला आहे. तरी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व पात्र लाभार्त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन आमदार दीपक चव्हाण यांनी केलेले आहे.
कोरोना लसीकरणाची तिसरी मोहीम 1 मेपासून सुरु करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात कंपन्यांना लस खुल्या बाजार विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कंपन्यांनी एका महिन्यात निर्मिती केलेल्या लसीच्या 50 टक्के लसी सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीला म्हणजे केंद्र सरकारला द्यायच्या आहेत. उरलेल्या 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खुल्या मार्केटला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीकरण हेच कोरोना विरुद्धच्या लढाईतील मोठं शस्त्र असल्याचं म्हटलं आहे. यापूर्वी 45 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस देण्यात येत होती. आता तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांना लस मिळणार आहे, अशी माहिती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.