
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २६ जुलै २०२३ । फलटण । भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा व माऊली फौंडेशन यांच्यावतीने महानुभाव पंथीयांसाठी दि. ३ ते दि. ७ ऑगस्ट दरम्यान दक्षिणकाशी श्री क्षेत्र फलटण ते उत्तरकाशी श्री क्षेत्र रुद्रपुर मोफत तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रेचे संयोजक व भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप शहा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या यात्रेमध्ये फलटण ते दौंड बसने आणि दौंड ते बडनेरा हा प्रवास रेल्वेने असणार आहे. बडनेरा ते रुद्रपुर पुन्हा बसने प्रवास होणार आहे. अमरावती येथील करंजकर बाबा मठ दर्शन व पूजा तेथील स्थान दर्शन या यात्रेमध्ये होणार आहे. १५० यात्रेकरुंना या यात्रेचा लाभ मिळणार आहे.
