क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने क्रेडाई वुमन्स विंगला मोफत औषधे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. २९ जुन २०२२ । फलटण । येथील क्रेडाई वुमन्स विंगच्या माध्यमातून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील रिंगरोड येथील कोणार्क हाऊस येथे मोफत मेडीकल कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे. त्यासाठी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून औषधे मोफत प्रदान करण्यात आलेल्या आहेत.

क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संचालक सुनील नेवसे यांनी क्रेडाई वुमन्स विंगच्या अध्यक्ष सौ. चंदा महेंद्र जाधव, उपाध्यक्ष सौ. वंदना राजेंद्र निंबाळकर यांचे प्रतिनिधी अमोल खलाटे यांनी मोफत औषधे स्विकारली. यावेळी महात्मा एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांची प्रमुख उपस्थिती होती.

Back to top button
Don`t copy text!