
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०३ जुलै २०२२ । फलटण । येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त फलटण तालुक्यातील वडजल येथील डॉ. तुषार शिंदे यांच्या श्री क्लिनीकच्या मार्फत आयोजित करण्यात येणार्या मेडीकल कॅम्पसाठी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून औषधे मोफत प्रदान करण्यात आलेली आहेत.
क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने फलटण तालुक्यातील वडजल येथे डॉ. तुषार शिंदे यांच्या मार्फत आयोजित करण्यात येणार्या मेडीकल कॅम्पला मोफत औषधे वितरित केली. यावेळी मिलिंद नेवसे यांच्या समवेत ॲड. ऋषिकेश काशीद, किसन चोरमले यांची प्रमुख उपस्थिती होती.
