
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ३० जुन २०२२ । फलटण । येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक चौकामध्ये आयोजित करण्यात येणार्या मेडीकल कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे. त्यासाठी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून औषधे मोफत प्रदान करण्यात आलेल्या आहेत.
क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संचालक सुनील नेवसे यांनी आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक चौकामधील मेडीकल कॅम्पच्या वतीने सर्फराज रियाज शेख व माधव मदने यांनी मोफत औषधे स्विकारली.
