
दैनिक स्थैर्य । दि. १५ नोव्हेंबर २०२२ । सातारा । भेकर आणि चौसिंगा या वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या तिघांना वनविभागाने कारवाई करून ताब्यात घेतले आहे ही कारवाई माची पेठ येथील श्री वास्तू अपार्टमेंट मध्ये करण्यात आली याप्रकरणी ठोसेघर येथील नारायण सिताराम बेडेकर विठ्ठल किसान बेडेकर व युवराज निमन यांना ताब्यात घेण्यात आले आहे यातील एक जण हा लष्कराचा जवान असल्याची माहिती आहे या कारवाईमध्ये ढेकर आणि चौसिंगा यांचे मटन भेकराचे मुंडके आणि पायाचे खूर जप्त करण्यात आले आहे.
सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांना काही लोकांनी दुर्मिळ प्राण्यांची शिकार केल्याची गोपनीय माहिती हाती लागली होती . त्यानुसार त्यांनी सहाय्यक वनरक्षक सुधीर सोनवणे वनक्षेत्रपाल डॉक्टर निवृत्ती चव्हाण , वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे व वनपाल व पंच असे दोन पथके तयार करून माची पेठ येथील श्रीवास्तू अपार्टमेंट मध्ये छापा टाकला त्यावेळी युवराज निमण सिताराम बेडेकर विठ्ठल बेडेकर यांना ताब्यात घेण्यात आले.
घरामध्ये चौसिंगा भेकर यांची मुंडकी, भेकरांचे ताजे मटण आणि पायाचे खूर या कारवाई मध्ये आढळून आले अधिक चौकशीमध्ये नारायण बेडेकर यांच्याकडे असलेल्या सिंगल बोर बंदुकीने सकाळी साडेसात वाजता भेकरांची शिकार बंदुकीने करण्यात आली व हे भेकर चेटकीच्या ओढ्यात सोलून त्याचा मटणाचा वाटा करण्यात आला या या मटणाची वाटणी सुरू असतानाच वनविभागाने ही कारवाई केली नारायण यांनी सर्व मटन स्वतःच्या घरात एका पिशवीत घालून पिशवी घरामागील खोलीत लपवून ठेवली होती तीन आरोपींना वनविभागाने शिताफीने सातारा व ठोसेघरीतून अटक केली सर्व मुद्देमाल दोन बंदुका एअरगन एक सिंगल बोर बंदूक जिवंत काडतूस भेकर सोलल्याचा चाकू लपवलेले मटण आणि कातडे सर्व वस्तू जप्त केल्या आहेत पंचांसमक्ष या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे आरोपींना अटक करण्यात आली असून वनविभागाच्या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये वनपाल दीपक गायकवाड कुशल पावरा, विक्रम निकम, राज मौसलगी,अशोक मलप मारुती माने साधना राठोड अश्विनी नरळे राजेश विरकर सुहास पवार सुरेश गबाले दिनेश नेहरकर पवन शिरतोडे यांनी भाग घेतला होता.