
दैनिक स्थैर्य । दि. १५ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा वाई व कोरेगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून हळद खरेदी करून त्यांची आर्थिक फसवणूक करणारा हळदी व्यापारी राजकुमार रमेशचंद्र सारडा याच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी या मागणीसाठी भारतीय किसान संघाच्या वतीने सातारा धरण आंदोलन करण्यात आले जिल्हाध्यक्ष सर्जेराव जाधव व उपाध्यक्ष सुरेश फाळके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशदारावर या मागणीसाठी ठिय्या दिला आहे.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना जाधव यांनी निवेदन सादर केले आहे या निवेदनात नमूद आहे की 2018 मध्ये हळद व्यापारी राजकुमार रमेशचंद्र सारडा यांनी वाई व सातारा कोरेगाव या तीन तालुक्यातील शेकडो शेतकरी बांधवांची हळद खरेदी करून फसवणूक केली आहे व शेतकऱ्यांचे हळदीचे कोट्यवधी रुपयांचे बिल बुडवले आहे गेले आठ महिन्यापासून सातत्याने पोलीस अधीक्षक सातारा यांच्याशी पत्र व्यवहार करूनही या व्यापाऱ्यावर कोणतीही प्रकारची कारवाई झाली नाही.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाईलाजास्तव भारतीय किसान संघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे शेतकऱ्यांचा आक्रोश लक्षात घेऊन संबंधित व्यापाऱ्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे या आंदोलनाची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात तातडीने योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.