मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या तक्रारींसाठी १८००१०२१०८० वर संपर्क साधा सक्तीच्या वसुलीविरुद्ध कारवाई – जिल्हाधिकारी शेखर सिंह

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

सातारा , दि. १: मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुलीबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. ग्राहकांकडून सक्तीने वसुली करत असल्याच्या तक्रारीविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा देतानाच, ग्राहकांनी अशा कंपन्यांच्या तक्रारींसाठी १८००१०२१०८० वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

सध्याच्या कोव्हीड -१९ महामारीच्या अनुषंगाने केंद्रशासन आणि राज्य शासनाकडून वेळोवेळी लॉकडाऊन करण्यात आले आहे. शासनाकडून मदतीच्या उपाय योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. 

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीबाबत काही ग्राहकांच्या तक्रारी आढळून येत आहेत. तर काही ग्राहकांना अशा मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या व्याज दर, विविध शुल्क व दंड तसेच अन्य तक्रारी असतील तर त्यांनी १८००१०२१०८० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. ही सुविधा मराठी भाषेत असल्याने ग्राहकांनी यावर तक्रारी दाखल कराव्यात असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुली बाबतीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. जर कंपन्यांनी ग्राहकांकडून सक्तीने वसुली करत असल्याचे निदर्शनास आल्यास, अशा तक्रारीविरोधात योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!