फलटणच्या बाणगंगा नदीला पुर सदृश्य परिस्थिती


दैनिक स्थैर्य । दि. ०८ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण शहरातुन वाहत असलेल्या बाणगंगा नदीला पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बाणगंगा नदी ही सध्या दुथडी भरून वाहत आहे. तर नदीकाठच्या घरामध्ये पाणी घुसल्याने अनेकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेची टिमने रात्री उशीराच तातडीने पाहणी करत उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे व नगरपरिषदेच्या टीमसोबत संपर्कात राहावे, असे आवाहन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.

ऐरवी बाणगंगा नदीला पाणी बघायला मिळत नाही. परंतु गेल्या काही दिवस चालु असलेल्या पावसामुळे बाणगंगा नदीवर असणारे बाणगंगा धरण हे पुर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे बाणगंगा नदीमध्ये पाण्याची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे व नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या सर्वांनाच सर्तकेचा इशारा नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!