मलठणच्या साई मंदिर परिसरात पावसाचे पाणी घरात; सत्ताधारार्यांच्या दबावामुळे मुख्याधिकार्यांचे मलठणकडे दुर्लक्ष : माजी नगरसेवक अशोकराव जाधव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०८ सप्टेंबर २०२२ । फलटण । गेले दोन दिवस फलटण शहरासह तालुक्याला पावसाने झोडपून काढलेले आहे. या पावसामुळे शहरातील मलठण भागामध्ये राहणाऱ्या साई मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी गेलेले आहे. फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन त्यांनी मलठण परिसराकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत. तरी नगरपालिकेच्या माध्यमातून तातडीने मलठण मधील नागरिकांना सोयी सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेली आहे.

गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे फलटण शहरांमधून वाहणाऱ्या बाणगंगा नदीला पूर सुदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. यासोबतच मलठण मधील सर्व भाग हा नदी सभोवताली असल्यामुळे मलटणमधील नागरिकांना पावसाच्या व पुराच्या पाण्याच्या पासून संभाव्य धोका उद्भवत आहे. पावसामुळे घरामध्ये गेलेले पाणी सुद्धा नागरिकांचे चिंता वाढवत उडवत आहे. तरी फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून लवकरात लवकर सर्व मलठणकर नागरिकांना उपाययोजना कराव्यात, अशी मागणी फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेली आहे.


Back to top button
Don`t copy text!