राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्य सचिवांचे अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. ०८ सप्टेंबर २०२२ । मुंबई । महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध पहिला आवाज उठवणारे राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपसचिव ज. जी. वळवी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांच्यासमवेत मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


Back to top button
Don`t copy text!