
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २ मे २०२३ | फलटण |
जिंती, तालुका फलटण येथे ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिना’चे औचित्य साधून ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप गणपतराव रणवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.एका प्रामाणिक कामगाराच्या हातून ध्वजारोहण करण्यात आल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यासाठी जिंती गावच्या सरपंच सौ. पल्लवीताई लोखंडे यांनी पुढाकार घेतला.
यावेळी सरपंच पल्लवीताई लोखंडे, माजी उपसरपंच अमित रणवरे, तंटामुक्ती अध्यक्ष महादेव रणवरे, श्री जितोबा स्कूल कमिटी चेअरमन राजेंद्र रणवरे, योगेश वाघमारे, पांडुरंग लोखंडे, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
